रवळनाथ पतसंस्थेच्या जिल्हा कार्यक्षेत्रवाढीला मंजुरी : चेअरमन अभिषेक शिंपी
आजरा, वृत्तसेवा :
आजरा येथील रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रवाढीला मंजुरी मिळाली आहे. याबाबतच्या आदेशाचे पत्र कोल्हापूर जिल्हा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी संस्थेला प्रदान केले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी यांनी दिली. आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, मार्गदर्शक व माजी जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.
स्वागत संस्थेचे व्हा. चेअरमन समीर गुंजाटी यांनी केले प्रास्ताविकात मॅनेजर विश्वास हरेर यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुढे बोलताना संस्थेचे चेअरमन शिंपी म्हणाले, संस्थेची विश्वासहर्ता पाहून सभासदांचे ठेवी ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या ठेवीतून कर्जपुरवठा करून संस्थेचा व्यवसाय वाढविणेचा आपला मानस आहे. याशिवाय आपल्या तालुक्याच्या आसपासच्या लोकांकडूनही कर्ज मागणी होत आहे. आजरा येथून बाहेरील तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकांकडूनही कर्ज मागणी होत होती. पण आपल्या संस्थेचे कार्यक्षेत्र तालुका असल्याने यावर मर्यादा येत होत्या. तसेच आपल्या संस्थेच्या सभासदांकडूनही कार्यक्षेत्र वाढीची मागणी होत होती. या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वसाधारण सभेत तसा ठराव करून जिल्हा कार्यक्षेत्र वाढीचा प्रस्ताव सहकारी संस्था कोल्हापूर यांचेकडे सादर केला होता. सदरच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या कार्यक्षेत्र वाढीमूळे संस्थेचा व्यवसाय वाढविणे आता सोईचे होणार आहे. तसेच बाहेरील तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या आजरावासियांनाही आता सुलभरित्या व्यवहार करता येणार असल्याचे स्पष्ट केले. याकामी आजरा तालुका सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे व वरिष्ठ लिपीक प्रमोद फडणीस यांचे विशेष सहकार्य मिळाले.
यावेळी संचालक मजीद मुराद, युसूफ गवसेकर, विक्रम पटेकर, किरण कांबळे, इब्राहीम इंचनाळकर, विलास कुंभार, विश्वास जाधव, सुधीर नार्वेकर, सौ अर्चना मराठे, सौ. माधुरी पाचवडेकर यांच्यासह ज्येष्ठ सभासद के. जी. पटेकर, सदानंद नार्वेकर, बाबासो नाईक, अशोक पोबार आदी उपस्थित होते आभार किरण कांबळे यांनी मानले.
=================
No comments:
Post a Comment