साळगाव बंधाऱ्यावर पाणी; आजरा तालुक्यात पावसाची संततधार
आजरा, वृत्तसेवा :
गेल्या आठ दिवसापासून आजरा तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. खरीप हंगामाच्या शेती कामांना वेग आला आहे. पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे तालुक्यातील हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. हिरण्यकेशी नदीवरील साळगाव (ता. आजरा) बंधारा बुधवारी रात्री पाण्याखाली गेला आहे. या हंगामात पहिल्यांदाच हा बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून पेरणोली, देवकांडगाव, गारगोटी कडे जाणारी वाहतूक सोहाळे मार्गे पर्यायी रस्त्यावरून वळवण्यात आली आहे.
=========
No comments:
Post a Comment