सर्फनाला प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू; आजरा तालुक्यातील जनतेचे 24 वर्षाचे स्वप्न पूर्ण
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणाऱ्या सर्फनाला मध्यम प्रकल्पात यावर्षी पहिल्यांदाच पाणीसाठा करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पहिल्यांदाच पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे आजरा तालुक्यातील जनतेचे 24 वर्षाची स्वप्न पूर्ण झाले आहे. 24 वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी गेल्या काही वर्षात जोरदार प्रयत्न केले. आमदार आबिटकर यांच्यामुळेच सर्फनाला प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नव्याने हरित क्रांती होणार आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. विविध अडचणींचा सामना करत यंदा घरभरणीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे यंदा धरणात पाणी साठवणूक करण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. प्रकल्पाच्या एकूण क्षमतेच्या 66% पाणीसाठा करण्यात आला आहे. 694 मीटर पर्यंत पाणीसाठा करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रकल्पाच्या सांडव्यावरून प्रथमच पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. 21 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारा सर्फनाला प्रकल्प आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास गेला आहे. हा प्रकल्प सुमारे २४ वर्ष रेंगाळला होता. घळभरणीचे काम पूर्ण झाल्याने यावर्षी या धरणात पाणीसाठा होणार आहे. सन २००० साली या प्रकल्पाला शासकीय मंजुरी मिळाली. सुरुवातीला सोपा असणारा हा प्रकल्प नंतर किचकट होत गेला. नेहमी प्रमाणे पुनर्वसनाचे प्रश्न सुटत नसल्याने संघटना व प्रकल्पग्रस्त पातळीवर विरोध होत गेला. अनेकवेळा काम थांबवले गेले. पुनर्वसन झाल्याशिवाय काम नाही हा निर्धार प्रकल्पग्रस्तांचा असल्याने व त्याची पूर्तता खात्याकडून झाली नसल्याने अनेक वर्षे काम रेंगाळले. अखेर आमदार आबिटकर यांच्या पाठपुराव्याने पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागले त्यामुळे पाणीसाठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
*दृष्टिक्षेपात सर्फनाला प्रकल्प*
* ०.६७ टीएमसी पाणीसाठा
* २२१ कोटी रुपये प्रकल्पावर झालेला खर्च
* प्रकल्पांतर्गत आजरा तालुक्यातील २० गावातील २६४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
*धरणाची लांबी १४४० मीटर असून उंची ३३.३२७ मी.
*पाणलोट क्षेत्र ११.८८ चौ.किमी.
*बुडीत क्षेत्र २४५.७२ हेक्टर
*सांडव्याची लांबी ८७ मी.
*विसर्ग क्षमता ३३९.६७ घमी/ सेकंद आहे.
*बुडीत क्षेत्रासाठी २८९.२० हेक्टर जमीन संपादन, यामध्ये खासगी २६६.४८ हे.,सरकारी १६.२२ हे व वनखात्याची ६.५० हे.याचा समावेश आहे
*या प्रकल्पांतर्गत शेळप, दाभिल, देवर्डे, साळगांव व सोहाळे हे ५ बंधारे
*लाभक्षेत्रातील गावांमध्ये पारपोली, शेळप, दाभिल, विनायकवाडी, देवकांडगाव, कोरीवडे, हरपवडे, पेरणोली, आल्याचीवाडी, गवसे, दर्डेवाडी, मेढेवाडी, देवर्डे, वेळवट्टी, कुरकुंदे, साळगांव, सोहाळे, बाची, पारेवाडी व पेठेवाडी या गावांचा समावेश
*बुडीत झालेल्या पारपोली व गावठाण या गावांचे पुनर्वसन देवर्डे व शेळप येथे पुनर्वसन वसाहतीमध्ये केले आहे. याठिकाणी सर्व नागरी सुविधा देण्यात आल्या.
===================
No comments:
Post a Comment