Tuesday, May 7, 2024

कोल्हापूर मध्ये अंदाजे ७०.३५ टक्के तर हातकणंगले मध्ये अंदाजे ६८.०७ टक्के मतदान

कोल्हापूर मध्ये अंदाजे ७०.३५ टक्के तर हातकणंगले मध्ये अंदाजे ६८.०७ टक्के मतदान

कोल्हापूर वृत्तसेवा : 

कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ कोल्हापूर व ४८ हातकणंगले या दोन मतदारसंघात मंगळवारी शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. ही आकडेवारी अंदाजे असल्यामुळे अंतिम आकडेवारीवेळी यात बदल होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूरकरांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरकरांना धन्यवाद दिले.
============

(ही आकडेवारी प्रशासनाच्या वतीने अंदाजीत प्रकाशित करण्यात आले आहे. अंतिम आकडेवारी अजून प्रसिद्ध व्हायची आहे.)
==============

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...