लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून हद्दपार करा; जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उमेश आपटे यांचे आवाहन
आजरा वृत्तसेवा :
लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही कांही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, त्यामुळे या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहून लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून हद्दपार करा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी केले. ते किटवडे ता. आजरा येथून चालू झालेल्या जनसंपर्क यात्रेत बोलत होते. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले कि २०१४ साली लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने लोकांची फसवणूक केली आहे. महागाईने कळस केला आहे. आरोग्य शिक्षणापासून सर्वच व्यवस्था शासन मोडायला निघाले आहे. हे थांबवायचं असेल तर भाजपा आणि त्यांच्या मित्रापक्षाना सत्तेतून हद्दपार केलेच पाहिजे.
श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाई म्हणाले, भाजप जाती-धर्मात फुट पडून आपली सत्तेची पोळी हे भाजत आहेत. आपल्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावर लोक एकत्र येउच नयेत यासाठी धर्म जातीचा उपयोग केला जात आहे. याला आवरायचं असेल तर यावेळी भाजपा आणि मित्र पक्षाचा पराभव केलाच पाहिजे.
राष्ट्रवादीचे मुकुंददादा देसाई म्हणाले, इंडिया आघाडीचे उमेदवार राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असलेले, सर्व जातीधर्मातील स्त्री-पुरुषांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहेत म्हणूनच आपण एक दिलाने त्यांच्या पाठीशी राहून त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवूया...
यावेळी गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, युवराज पवार, अभिषेक शिंपी यांनीही मनोगते व्यक्त केली. किटवडे येथून सुरु झालेली जनसंपर्क मोहीम लिंगवाडी, आंबाडे, घाटकरवाडी, धनगरमोळा, गवसे येथे सभा घेऊन सांगता झाली. या जनसंपर्क यात्रेत उदयराज पवार, रणजीत देसाई, प्रकाश मोरुस्कर, गोविंद पाटील, संकेत सावंत उत्तम देसाई, शिवाजी पाटील, महादेव हेब्बालकर, सहदेव प्रभू, संतोष पाटील, विक्रम देसाई, दिनेश कुरुणकर, विलास पाटील, अशोक पोवार हे या जनसंपर्क यात्रेत सहभागी झाले होते. इंडिया आघाडीचे तालुका समन्वयक रवींद्र भाटले यांनी आभार मानले.
=============
No comments:
Post a Comment