विद्या मंदिर साळगाव शाळेत नेट बँकिंग व युपीआयचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
आजरा वृत्तसेवा :
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात शालेय वयातच बँकिंग व्यवहार व नेट ब्ँकिंग, आँनलाईन व्यवहार याबाबत मार्गदर्शन व्हावे यासाठी विद्या मंदिर साळगाव शाळेत नेट बँकिंग व युपीआयचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंजिरी यमगेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बजाज फायनान्सचे प्रतिनीधी संदिप सासुलकर उपस्थित होते.
सुरवातीला संजय मोहिते यांनी पाहुण्यांची ओळख व उपक्रमाचा उद्देश सांगुन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे बजाज फायनान्सचे प्रतिनीधी संदिप सासुलकर यांनी बँक व्यवहार पुर्वीचे कसे होते व आता डिजिटल दुनियेत कसे आहेत, नेट ब्ँकिंग, युपीआय याबाबत मोबाईलचा वापर करुन मुलांना सखोल मार्गदर्शन केले. या व्यवहारात ग्राहकांची फसवणुक कशी होते, यासाठी खबरदारी कोणती घ्यावी याबाबत दैनदिन व्यवहारातील अनुभव सांगितले. इंग्रजी विषयाचा याठिकाणी किती फायदा होतो याबाबत आपला अनुभव सांगितला. शाळेतील सर्वच मुले उत्सुकतेने या उपक्रमात सहभागी झाली. मुख्याध्यापिका यमगेकर यांनी याबाबत आपले अनुभव व आज या विषयाची गरज याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. गिता जंगम, निवृती मिटके यांनी नेट बँकिंगचे अनेक अनुभव व शंका विचारुन माहिती घेतली. शेवटी मिटके सर यांनी सर्वांचे आभार मानले.
----- -----
No comments:
Post a Comment