22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी जाहीर
मुंबई वृत्तसंस्था :
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात सर्वांना सहभागी होता यावे तसेच सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 22 जानेवारीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सु्ट्टी जाहीर केली. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी म्हणजे 22 जानेवारीला सरकारी आणि खाजगी कार्यालयं, शाळा-कॉलेजला सुट्टी असेल.
No comments:
Post a Comment