'एक वोट एक नोट'च्या सहकार्याने विजय देसाई यांच्या पाठीशी राहण्याचा वाटंगीकरांचा निर्धार
वाटंगी : प्रतिनिधी
आजरा शेतकरी सहकारी साखर कारखानाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा ज्वर आता वाढू लागला आहे. दोन आघाड्यांमध्ये दुरंगी चुरशीचा सामना होत आहे. तालुक्यात सर्वत्र निवडणुकीची जोरात चर्चा सुरू आहे. यातच चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीचे आजरा-शृंगारवाडी गटातील उमेदवार व वाटंगी (ता. आजरा) गावचे सुपुत्र विजय बाबुराव देसाई यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार वाटंगीकरांनी व्यक्त केला आहे.
देसाई यांच्या उमेदवारीला पाठिंबा म्हणून 'एक नोट एक वोट' चा नारा देत सहकार्याची भूमिका घेतली आहे. गावातील रवळनाथ संस्था समूह, शिवराज संस्था समूह, सुरेश शिंगटे फाउंडेशन व तरुण मंडळे यांनी शक्य होईल ती आर्थिक मदत देसाई यांना देऊ केली आहे. उसाच्या शेताच्या बांधावर राबणारा वाटंगीचा भूमिपुत्र आजरा साखर कारखान्यात पोहोचला पाहिजे यासाठी तमाम वाटंगी कर मोठ्या जिद्दीने प्रयत्न करत आहेत. तसेच देसाई उमेदवारी करत असलेल्या चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीच्या कपबशी या चिन्हावर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
--- ---
No comments:
Post a Comment