गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
करंबळी (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायतीस जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सन २०२०-२१ सालचा स्व. आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतिश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी करंबळीचे सरपंच प्रविण माळी, ग्रा.पं सदस्य उमा सुतार, सविता पोवार, शोभा पाटील, शेवंता माळी, सुनिता कदम, तानाजी कणसे, गौतम कांबळे, एकनाथ गवस, ग्रामसेवक विक्रमसिंह महाजन तसेच ग्रामस्थांनी पुरस्कार स्विकारला.
गाव शैक्षणिक दृष्ट्या प्रगत आहे. महिला सबलीकरण योजना, देशसेवेत कार्यरत आजी माजी सैनिक संघटना, ग्रामपंचायतीने राबविलेले विविध उपक्रम, केलेली विकासकामे, अाद्ययावत ठेवलेले ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड या निकषाच्या आधारे गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून पुरस्कार प्राप्त केला आहे. दहा लाख रुपये व प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सरपंच प्रविण माळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला केलेल्या सहकार्यामुळे आपल्या गावाला हा पुरस्कार मिळाला अशा भावना व्यक्त केल्या.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
No comments:
Post a Comment