Thursday, November 13, 2025

विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व : अशोकअण्णा चराटी, वाढदिवस विशेष....

विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व : अशोकअण्णा चराटी, वाढदिवस विशेष....

खडतर व संघर्षमय परिस्थितीतून मिळालेल्या जबाबदारीतून स्वतःला सिद्ध करत अशोकअण्णा चराटी यांनी आपल्या नेतृत्वगुणाची छाप पडली आहे. प्रत्येक वेळी जिल्हा नेतृत्वाला देखील अशोक चराटी यांची दखल घ्यावी लागते. जिद्द आणि चिकाटी ठेवून विविध क्षेत्रात काम करत असताना चराटी यांनी तालुक्यातील सहकार, शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे योगदान दिलेले आहे. आजरा तालुक्याच्या विकासाचा ध्यास त्यांना नेहमीच लागलेला असतो. अशा या नेतृत्वाचा शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे त्या निमित्ताने....

अतिशय संघर्षमय परिस्थितीत अशोक चराटी यांचे नेतृत्व पुढे आले. आजरा येथील आण्णा भाऊ संस्था समूहाचे सुत्रे हाती घेतली, त्यावेळी संस्था समूहात एक पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी भरुन काढत, नव्या-जुन्या सहकार्‍यांच्या समन्वयातून चराटी यांनी संस्था समूहाचा विस्तार केला. आज जिल्ह्यातील एक आदर्श सहकारी संस्था समूह म्हणून हा संस्था समूह कार्यरत आहे. आजरा अर्बन बँक, जनता शिक्षण संस्था, आण्णा भाऊ आजरा सूतगिरणीसह इतर अनेक संस्था चराटी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या लौकीकाप्रमाणे कार्यरत आहेत. या संस्थांच्या विकासासाठी आण्णा नेहमीच झपाटून काम करतात. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, आजरा साखर कारखाना अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. आजरा नगरपंचायत होण्यासाठी आण्णा ज्याप्रमाणे झटले तसेच सध्या आजरा शहराच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. नवनिर्मीत नगरपंचायत असल्याने विकासनिधीसाठी ते नेहमीच आग्रही असतात. आजरा तालुक्याला आमदार नसल्याने तालुक्याच्या विकासाला निधी मिळावा या करता आण्णा जिल्ह्यातील नेत्यांशी करारी पद्धतीने वागत आपला बाणा दाखवून निधी खेचून आणतात. आजरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विकास हाच भाव त्यांच्या मनात नेहमीच असतो. अशा विकासाचा ध्यास घेतलेल्या नेतृत्वास दीर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा....!!
..... विकास सुतार (संपादक)
=======================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...