पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी व जनजागृतीसाठी दि. २१ नोव्हेंबरपासून आंबोली (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे 'बायोडायव्हर्सिटी मीट' म्हणजेच 'जैवविविधता मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. गेली २० वर्षे निसर्गसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या 'मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, आंबोली' व वन विभाग यांच्या वतीने हा मेळावा घेण्यात येत आहे.
मेळाव्यात सरपटणारे प्राणी व त्यांचे विश्व या विषयावर केदार भिडे, उभयचर प्राणी यावर के. व्ही. गुरुराज (बंगळुरू), वन्यजीव व वन अपराध या विषयावर रोहन भाटे, पक्षी व त्यांचे जीवन यावर पराग रांगणेकर (गोवा), फंगी म्हणजेच बुरशी या विषयावर शीतल देसाई, वन्यप्राणी यावर गिरीश पंजाबी, वनसंवर्धन आणि वनांविषयीचे इतर प्रश्न यावर भाई केरकर (गोवा), फुलपाखरू व पतंग यावर हेमंत ओगले व मिलिंद भाकरे, वनस्पती तज्ज्ञ मिलिंद पाटील, वटवाघूळ तज्ज्ञ राहुल प्रभू खानोलकर आणि निसर्गातील घडामोडी आणि सोशल मीडिया विषयावर रमण कुलकर्णी बोलणार आहेत. उपक्रमांतर्गत तज्ज्ञांची व्याख्याने, जंगल भ्रमंती व इतर उपक्रम ठेवण्यात आले आहेत. उपक्रमास जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्यासाठी mnccamboli2016 @gmail.com येथे नोंदणी करण्याचे आवाहन संयोजक काका भिसे (आंबोली), राजेश देऊळकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
========================
========================
No comments:
Post a Comment