Tuesday, November 4, 2025

निंगुडगे येथील वारकरी महिलेचा रस्ता ओलांडताना अपघातात दुर्देवी मृत्यू

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
कार्तिकी वारीसाठी पंढरपूर येथे गेलेल्या निंगुडगे (ता. आजरा) येथील वारकरी महिला इंदुबाई भिकाजी परीट (वय 70) यांचा वारीवरून परत येत असताना रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी दि. 31 रोजी निंगुडगे गावातील वारकरी मंडळी कार्तिक वारीला क्रूझर वाहनाने पंढरपूर येथे गेले होते. रविवारी विठ्ठलाचे दर्शन घेतले. सोमवारी गावी परत येत असताना सोलापुर जवळ फळे खरेदीसाठी व चहापाणी घेण्यासाठी गाडी थांबली होती. त्यावेळी रस्ता ओलांडताना परिट यांना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने गंभीर जखमी झाल्या. दवाखान्यात नेल्यावर उपचारपूर्वी त्यांचे दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी निंगुडगे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित दोन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे, त्यांच्या मृत्यूने निंगुडगे गावात शोककळा  पसरली.
=============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...