Wednesday, November 19, 2025

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना ऊसाला प्रतिटन 3 हजार 400 रुपये देणार

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याकडे चालु सन 2025-26 या गळीत हंगामात गळीतास येणा-या ऊसाला प्रति मे.टन रू.3 हजार 400 इतका विनाकपात एकरकमी ऊस दर देणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना हा सहकारी तत्वावर सुरु असलेला साखर कारखाना असुन आजअखेर 15 दिवसात कारखान्यात 50 हजार मे.टन ऊस गाळप झाले आहे. कारखान्याकडे पुरेशी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा कार्यरत असुन त्या यंत्रणे मार्फत आजरा तालुक्या बरोबरच गडहिंग्लज, चंदगड इत्यादी भागातुन नियमित ऊस पुरवठा सुरू आहे. गळीतासाठी येणा-या ऊसाची बिले नियमित व वेळेवर देण्याचे आर्थिक नियोजन संचालक मंडळाने कोल्हापूर जिल्हा मध्य. सहकारी बँकेच्या सहकार्याने केलेले आहे. कारखान्याकडे या हंगामासाठी शेतक-यांनी आजरा, गडहिंग्लज व चंदगड तसेच आंबोली क्षेत्रातुन मोठया प्रमाणावर ऊसाचे करार केलेले आहेत. तसेच करार न केलेल्या शेतक-यांनीही कराराची पुर्तता करून आपण पिकविलेला संपुर्ण ऊस आजरा साखर कारखान्यास गळीतासाठी पाठवुन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी केले आहे.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई, कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे, विष्णु केसरकर, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधिर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारूती घोरपडे, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक श्री.एस. के. सावंत उपस्थित होते.
===================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...