मुंबई, न्यूज नेटवर्क :
देशात १ जूनपासून ३१ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या सहा टक्के पाऊस अधिक नोंदला आहे. हा पाऊस ३१ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या श्रेणीत आहे. सप्टेंबरमध्ये पूर्ण देशामध्ये दीर्घकालीन सरासरीच्या अधिक पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने रविवारी वर्तवली. हा पाऊस सरासरीच्या १०९ टक्के पडू शकतो, असा अंदाज आहे. यामध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरी किंवा अधिक पाऊस पडू शकतो, तर कोकण विभागात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
देशामध्ये ईशान्य आणि पूर्व भारताचा काही भाग, दक्षिण भारताचा काही भाग, उत्तर भारताचा टोकाचा भाग येथे सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडू शकेल. सप्टेंबर महिन्यामध्ये देशभरात सरासरी १६७.९ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा हा पाऊस सरासरीच्या १०९ टक्के पडू शकेल. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्येही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या तसेच दक्षिण आणि उत्तर कोकणाच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. या पावसामुळे शेतीला काही ठिकाणी फायदा होऊ शकतो. मात्र त्याचबरोबर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याचीही वेळ येऊ शकते याकडेही भारतीय हवामान विभागाने लक्ष वेधले आहे. सप्टेंबर महिन्यातील पावसाचा परिणाम अर्थातच तापमानावर होणे अपेक्षित आहे. या कालावधीत देशातील सर्वसाधारण तापमान हे सरासरी किंवा त्याहून कमी असू शकेल. मात्र ज्या भागामध्ये सप्टेंबरमध्ये फारसा पाऊस नाही त्या भागांमध्ये हे तापमान चढे असेल. यामध्ये पूर्व आणि ईशान्येकडील बहुतांश भागाचा समावेश आहे. कोकण विभागामध्येही सरासरीहून अधिक कमाल तापमान असेल अशी शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये बहुतांश देशामध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असू शकेल.
===================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment