आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर शहर व महागाव येथे घरगुती गॅस सिलेंडर मधून गळती होऊन स्फोट झाला. या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील घरगुती गॅस सिलेंडर धारकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांनी केले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आजरा तहसील कार्यालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूर शहरात व महागाव, (ता. गडहिंग्लज) येथे शनिवारी दि. ०६ सप्टेंबर २०२५ रोजी घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती होवून स्फोट झाला. कोल्हापूर येथे झालेल्या गॅस गळतीने जीवितहानी झाली असून महागाव येथे गॅस गळतीने झालेल्या स्फोटातून भलेही जीवीतहानी टळली असली तरी घराचे व प्रापंचिक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे प्रकार आजरा तालुक्यामध्ये घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून तहसिल कार्यालय (पुरवठा) आजरा येथील पुरवठा निरिक्षक संदिप चव्हाण यांनी सोमवारी दि. ८ सप्टेंबर रोजी रवळनाथ इंडेन या गॅस एजन्सीची मुंगुसवाडी, खेडे येथे असलेल्या सिलेंडर साठा गोदामास भेट देवून तपासणी केली. तपासणी वेळेस गॅस वितरणचे विक्रेते मानसिंग देसाई उपस्थित होते. तपासणी वेळेस गोदामातील सिलेंडर तपासले गेले. तसेच गळती लागलेले सिलेंडर कंपनीकडून प्राप्त झाल्यास तात्काळ परत करण्याचे व ग्राहकास गळती असलेले सिलेंडर देवू नये तसेच गॅस सिलेंडर वितरीत करताना गॅस गळतीबाबत घ्यावयाची खबरदारीबाबत गॅसधारकास माहिती करुन देण्याच्या सुचना गॅस वितरकास देणेत आल्या.
तहसीलदार समीर माने व तालुका प्रशासन यांच्यावतीने आजरा तालुक्यातील सर्व गॅस ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, सिलेंडर मधून गॅस गळती होत असल्याचे आढळल्यास तात्काळ गॅस एजन्सीस संपर्क करावा. अधिकृत गॅस एजन्सीकडून गॅस रेग्युलेटर व गॅस पाईप जोडून घ्यावे व तसेच वेळोवेळी शेगडी, रेग्युलेटर, गॅस पाईप याची गॅस एजन्सीकडून तपासणी करुन घेणेत यावी. गॅसचा वापर करताना कंपनीने दिल्या गेलेल्या सुचनेनसार हाताळणी करण्यात यावी जेणेकरुन तालुक्यात कोणतीही गॅस दुर्घटना घडू नये.
तपासणीचे वेळी रवळनाथ गॅस एजन्सीचे मानसिंग देसाई यांनी भविष्यात गॅस बाबतीत कोणतीही समस्या उद्भवू नये करीता कंपनीने उत्पादित केलेले फायबर मध्ये निर्माण केलेले १० किलो गॅस असलेले सिलेंडर वापरण्याचे सुचित केले. जे हाताळणीस सुलभ असेल. गॅस गळती व स्फोट हा प्रकार होण्याचा प्रकार फारच कमी राहील.
==============
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment