आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
भारतीय राज्यघटनेनुसार हिंदी ही आपली राजभाषा आहे. संपूर्ण भारतीयांना एकत्र जोडून ठेवण्याचे काम हिंदी करत आहे. भारत देशात प्रत्येक राज्याची आपली स्वतंत्र भाषा आहे. परंतु सर्वजण जेव्हा एकत्र येताता तेव्हा एक - दुस-याशी संपर्क करण्याकरिता एका भाषेची गरज असते. ती गरज पूर्ण करण्यची क्षमता हिंदी भाषेत आहे, असे मत प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे यानी व्यक्त केले. आजरा महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
डॉ. सादळे पुढे म्हणाले, आपल्या भावना आणि विचारांना व्यक्त करण्याचे प्रमुख साधन म्हणजे भाषा होय. परंतु आपली मूळं आणि संस्कृती याना जोडण्याचं कामदेखील भाषाच करते. आणि हे काम हिंदी भाषा अत्यंत प्रभावीपणे करत आहे. तीच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. हिंदी दिवसानिमित्त हिंदी शब्दशोध, हिंदी शुद्ध लेखन, हिंदी कथाकथन व हिंदी वाक्यप्रचार लेखन स्पर्धांचे आयोजन हिंदी विभागामार्फत करण्यात आले होते. यातील विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रंथ, पेन व पुष्प देऊन गौरविण्यात आले. स्पर्धांमधील विजेते (अ) हिंदी शब्दशोध : प्रथम क्रमांक - वंदना भागोजी कस्तुरे, द्वितीय क्रमांक नागेश लक्ष्मण गाडीवड्डर, तृतीय क्रमांक माधुरी उदय कांबळे, (आ) शुद्ध लेखन : प्रथम क्रमांक तेजल तानाजी कांबळे, द्वितीय क्रमांक हर्षाली किरण पारके, तृतीय क्रमांक - स्मिता बळवंत आडसोळ, (इ) हिंदी कथाकथन : प्रथम क्रमांक - तमन्ना जबिला जमाल, द्वितीय क्रमांक - विठ्ठल बयाजी वरक, तृतीय क्रमांक - अथर्व उदय सुतार, (ई) वाक्यप्रचार लेखन : प्रथम क्रमांक - विठ्ठल बयाजी वरक, द्वितीय क्रमांक - तेजल तानाजी कांबळे, तृतीय क्रमांक - वंदना भागोजी कस्तुरे.
स्वागत व प्रास्ताविक प्रो. (डॉ.) अशोक बाचुळकर यानी केले. श्रीमती संजीवनी कांबळे यानी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रत्नदीप पवार यानी केले. यावेळी व्होकेशनल विभागाचे पर्यवेक्षक श्री. मनोज पाटील, मराठी विभागप्रमुख प्रो. (डॉ.) आनंद बल्लाळ, श्री. शेखर शिऊडकर, ज्युनियर विभागाचे श्री. विनायक चव्हाण, श्री. अनिल निर्मळे व विद्यार्थी उपस्थित होते.
=================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment