वेळवट्टी (ता. आजरा) येथील स्व. रावसाहेब शामराव देसाई सहकारी गृहतारण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक (सन-२०२५-२०३०) बिनविरोध पार पडली. या कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद फडणीस यांनी काम पाहिले. आजरा सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे यांचे सहकार्य लाभले. यानंतर संस्थेच्या चेअरमन पदी इंद्रजित रावसाहेब देसाई तर व्हा. चेअरमन पदी अवधूत यशवंत शिंदे यांची निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी देसाई यांचे नाव श्रीधर गोरे यांनी सुचविले त्यास सदानंद देसाई यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन पदासाठी शिंदे यांचे नाव श्रीकांत कळेकर यांनी सुचविले त्यास शिवाजी गुरव यांनी अनुमोदन दिले. यावेळी आजरा सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे यांचे हस्ते चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीची पत्रे देऊन सत्कार करणेत आला, यावेळी संचालक श्रीधर गोरे, श्रीकांत कळेकर, सदानंद देसाई, अमित निकम, ज्ञानदेव गावडे, शिवाजी गुरव, शिवाजी खवरे, मंगल निर्मळे, स्वाती कुंभार व सर्व कर्मचारी उपस्थित होते. संस्थेने वर्षपुर्तीपुर्वीच २ कोटी ठेवीचा टप्पा पुर्ण केला असुन, कर्ज वितरण १ कोटी ३५ लाख केले आहे. तसेच संस्थेची गुंतवणूक ६५ लाख आहे.
=====================
=====================
No comments:
Post a Comment