Saturday, August 16, 2025

सोमवारचा (दि. 18) रोजी मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार; शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय.

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
सोमवारी (दि. 18) रोजी आजरा तहसील कार्यालयावर निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते.
   
गेले आठ-दहा दिवस आजरा तालुक्यातील वेगवेगळ्या गावात मोर्चाच्या तयारीसाठी झालेल्या बैठकांचा आढावा घेताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की तालुक्यातील प्रस्तावित दाभिल, शेळप, पारपोली, खेडगे, आंबडे, धनगर मोळा, घाटकरवाडी आणि नव्याने सुचविलेल्या जेऊर, चितळे, कासारकांडगाव, भावेवडी या सर्व गावांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे, मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने उतरणार आहेत. विद्याधर गुरबे म्हणाले, हा प्रश्न केवळ शेतीचा नाही तर इथल्या पर्यावरण आणि माणसांच्या आयुष्याचा आहे. आज आपण गप्प बसलो तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून आम्ही सर्व शक्तीनिशी या लढ्यात उतरलो आहोत. संजय तरडेकर म्हणाले, आम्ही चंदगड मार्गावरील सर्व गावांनी विरोध करण्याचा निर्णय केला आहे, सोमवारच्या मोर्चात आम्ही ताकदीने उतरणार आहोत. मुकुंददादा देसाई म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्षांना सोबत घेऊन या लढ्यात मोठ्या संख्येने उतरणार आहोत. यावेळी रियाज शमनजी, अल्बर्ट डिसोझा, राजेंद्र गड्यांनवर, अमर चव्हाण, युवराज पोवार, नागेश चौगुले यांनीही कांही सूचना मांडल्या. यावेळी रवींद्र भाटले, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, कॉ शांताराम पाटील, नौशाद बुड्डेखान, विक्रम देसाई, कृष्णा सावंत, दिनेश कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
======================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...