Friday, April 4, 2025

जनता गृहतारण संस्थेने केला शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण

आजरा विकास न्यूज नेटवर्क :

रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या आजरा येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. संस्थेच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. याकरिता संस्थेचे सन्मानीय सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांनी केलेल्या सहकार्याबददल संस्था सदैव ऋणी आहे, अशा भावना चेअरमन मारुती मोरे यांनी व्यक्त केल्या. वर्ष समाप्तीपूर्वीच संस्थेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केल्याने भविष्यात सभासद व कर्जदारांसाठी आणखीण काही चांगल्या योजना आखता येतील अशी माहिती देताना ते बोलत होते.

चेअरमन मोरे पुढे म्हणाले, मुख्य कार्यालयासह सात शाखांचा विस्तार असलेली ही संस्था माणसं जोडणारी संस्था म्हणून ओळखली जाते. संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र आणि आयएसओ मानांकन देखील संस्थेला मिळाले आहे. काटकसर आणि पारदर्शक कारभारामुळे संस्थेची विश्वासार्हता दिवसेंदिवस वाढत आहे. अत्यंत कमी कालावधीत जनता सहकारी गृहतारण संस्थेनं घेतलेली गरूड भरारी ही संचालक मंडळाच्या चोख कारभाराची पोचपावती आहे, असे त्यानी सांगितले.

यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. गणपतराव अरळगुंडकर, प्राचार्य प्रो. (डॉ) अशोक सादळे, प्रो. (डॉ) अशोक बाचुळकर, प्रो. (डॉ) तानाजी कावळे, प्रा. श्री. विनायक चव्हाण, प्रा. श्री मनोज देसाई, श्री. अॅड सुभाष डोंगरे, प्रा. श्री. बळवंत कडवाले, प्रा. सौ लता शेटे, सौ. डॉ. अंजनी देशपांडे, प्रा. सौ. नेहा पेडणेकर, मॅनेजर मधुकर खवरे, प्रशासन अधिकारी मारुती कुंभार आदि उपस्थित होते.
=============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...