आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
जनता सहकारी बँक आजरा या बँकेला सन २०२४-२०२५ साली ७ कोटी ९५ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून बँकेने ४०० कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पूर्ण करत बँकेच्या मार्च २०२५ अखेर एकूण ठेवी ४०९ कोटी ९१ लाख रुपये, कर्ज २५९ कोटी ३६ लाख रुपये व गुंतवणुक १७५ कोटी ८० लाख रुपये इतक्या आहेत. बँकेने या वर्षात ४०० कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण करणेचा संकल्प केला होता. त्याला उदंड प्रतिसाद देत सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांनी बँकेबद्दल असलेला विश्वास व आत्मीयता सार्थ ठरविली आहे.
बँकेचा एनपीए शुन्य टक्के, सीआरएआर १४.४१ टक्के व बँकेचा एकूण व्यवसाय ६६९ कोटी २८ लाख रुपये असून बँकेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे, मुंबई व उपनगरे या जिल्हयात असून बँकेच्या एकूण २० शाखा कार्यरत आहेत. बँकेने सर्व प्रकारची अद्यावत टेक्नॉलोजी अमलात आणुन सर्व अद्यावत डिजीटल सेवा ग्राहकांना देणेत यशस्वी ठरली आहे. बँकेने आजपर्यंत जे जे ठरविले आहे ते ते सर्व वेळेत पूर्ण केलेले आहे. त्यासाठी बँकेला लाभलेले कुशल नेतृत्व मुकुंददादा देसाई व उच्च विद्याविभुशीत अनुभवी सीईओ एम. बी. पाटील यांची कडक शिस्त व अतिशय स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे बँकेने वेगवेगळ्या यशाचे टप्पे पूर्ण करत बँकेची घोडदौड सतत उंचावत ठेवली आहे. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये इंटरनेट व लिज लाईनच्या खंडीत सेवेमुळे बँकेने बँकेचे डाटा सेंटर नव्याने कोल्हापूर येथे उभा केलेले आहे.
हे सर्व करत असताना बँकेने सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व कर्मचारी यांना सर्व सुविधा देणेत समतोल राखला असून कर्मचाऱ्यांना यावर्षी १५ टक्के बोनस व रजेच्या पगाराची तरतुद केली आहे. नुकतेच रिझर्व बँकेने कल्याण व गारगोटी शाखेला मंजुरी दिली असून येणाऱ्या आर्थिक वर्षात अल्पावधीतच नवीन शाखा सुरु करुन ग्राहकांच्या सेवेत हजर होत असलेबाबतचे बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी व्यक्त केले. या यशामध्ये बँकेचे सर्व कर्मचारी व बँकेचे सर्व ग्राहक यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये ५०० कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण करणेचा मानस बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई व सीईओ एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन अमित सामंत, संचालक महादेव टोपले, रणजित देसाई, जयवंत शिंपी, बाबाजी नाईक, शिवाजी पाटील, विक्रमसिंह देसाई, जयवंत कोडक, संतोष पाटील, पांडुरंग तोरगले, महेश कांबळे, रेखा देसाई, नंदा केसरकर, सीए संभाजी अस्वले व अॅड शंकर निकम तसेच बँकेचे अधिकारी पी. ए. सरंबळे, एस. एच. चौगुले, एम. वाय. सावंत, एन. जी. कुंभार व आयटी मॅनेजर एस. बी. पाटील उपस्थित होते.
====================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment