Saturday, March 15, 2025

उत्तूरच्या महालक्ष्मी यात्रा नियोजनासाठी बैठक

उत्तूर, विकास न्यूज नेटवर्क :

उत्तूर (ता. आजरा) गावच्या मे २०२५ मध्ये होणा-या महालक्ष्मी यात्रेच्या नियोजनासाठी  येथील भावेश्वरी मंदिरात  बैठक झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष व सरपंच किरण आमणगी  होते.

मंदार हळवणकर यांनी स्वागत केले. सुरवातीला यात्रा नियोजनाचा आढावा घेणेत आला. मंदिर रंगरंगोटी व दुरुस्ती, नविन मूर्तीची प्रतिष्ठापणा कारणे, जुन्या मूर्तीचे विसर्जन करणे, यात्रेसाठी लोकवर्गणी ठरवणे व जमा करणे याबाबत चर्चा झाली. सभेत महोत्सवास होणा-या खर्चाला मंजूरी देणेत आली. यात्रा काळात नागरीकांनी चार पाळक पाळणे व पार्किंग व्यवस्था याबाबत चर्चा झाली. लक्ष्मी देवीच्या आयोजना संदर्भात कमिटीचे सह सचिव संजय धुरे यांनी माहिती दिली. देवीच्या विधींसाठी पुरोहितांची व्यवस्था, भक्तांसाठी जागा, वाद्यवृंद व इतर गोष्टींचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेचे अंतिम कार्यक्रम व वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. ज्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येते त्या उत्सव मूर्ती (लाकडी मूर्ती) ची दुरुस्ती व रंगकाम सुरु असल्याची माहीती यावेळी देणेत आली.

यावेळी कमिटीचे उपाध्यक्ष सागर येसादे, सहसचिव कल्लाप्पा नाईक, सचिव आप्पासाहेब शिंत्रे, खजिनदार वैभव कुराडे, सह खजिनदार मंदार हळवणकर, सल्लागार शशिकांत रेडेकर तसेच अभिजीत आरेकर, विजय वांद्रे, दयानंद दोरुगडे, सुहास पोतदार, अनिकेत नाईक, प्रवीण पावले, विशाल उत्तूरकर, पांडुरंग मुळीक, आकाश इंगळे, शिवाजी राजाराम, गोपी देसाई, सनी अमनगी
आदी उपस्थित होते. सभेचे स्वागत व आभार मंदार हळवणकर यांनी केले.
============================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...