Saturday, March 15, 2025

गडहिंग्लज परिसरात वळीव पावसाची हजेरी

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क :

गडहिंग्लज शहर आणि परिसरात शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वळीव पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.  गेले दोन दिवस हवेतील उष्मा वाढला होता, दुपारी झालेल्या वळीव पावसा नंतर हवेत काहीसा गारवा जाणवत होता.

सूर्य आग ओखत असून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना शनिवारी झालेल्या वळीव पावसाने  दिलासा मिळाला आहे. विजेच्या कडकडाट व ढगांचा गडगडात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.  हा पाऊस गडहिंग्लज शहर व वडरगे, बेकनाळ आधी ग्रामीण भागात जोरदार पणे कोसळला.रस्त्यावर पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले तर गटारी तुंडूब भरून वाहत होत्या.
==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...