Friday, January 31, 2025

पोलीस असल्याची बतावणी करून उत्तूरमध्ये वृद्धाचे एक लाख ऐंशी हजाराचे सोन्याचे दागिने लंपास

आजरा, वृत्तसेवा :
दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध व्यक्तीची गांजा बाबत तपासणीचा बहाणा करीत वृद्धाकडील एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्याची घटना शुक्रवारी उत्तुर येथे घडली. याबाबत तुकाराम धोंडीबा पाटील (रा. कडगाव ता. गडहिंग्लज) यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पाटील हे काही कामानिमित्त उत्तुर येथे गेले होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकल वरून पाटील यांच्या जवळ आल्या. त्यापैकी मोटरसायकल चालवणाऱ्या व्यक्तीने आपण पोलीस असल्याचे सांगितले. तसेच आपल्या बरोबर असणारी व्यक्ती गांजा प्रकरणातील आरोपी असल्याचे सांगितले. तसेच पाटली यांच्याकडे गांजा आहे का? अशी विचारणा करत तपासणीच्या बहाण्याने उत्तुर बसस्थानकासमोरील एका मोकळ्या शेडमध्ये नेले. त्यावेळी त्या अज्ञात व्यक्तींनी पाटील यांची तपासणी करून त्यांच्याकडील सोन्याची अंगठी व चेन आपल्याकडील रुमालात बांधून पाटील यांच्याकडे दिले. व त्यांना घरात जाऊन उघडून पाहण्यास सांगितले. पाटील यांनी घरात जाऊन रुमाल उघडून पाहिला असता, त्यामध्ये सोन्याचे दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यातून त्या अज्ञात दोन इसमांनी एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे व आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले.
====================

आजरा शहरातील अपघातात शाळकरी विद्यार्थी ठार

आजरा, वृत्तसेवा :
आजरा-आंबोली मार्गावरील आजरा शहरातील बस स्थानका जवळील बँक ऑफ इंडिया एटीएम समोर झालेल्या अपघातात प्रज्वल प्रकाश बापट (वय 16 रा. चाफवडे ता. आजरा) या शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास झाला.
=============

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...