रविवारी सर्फनाला प्रकल्पातील पाण्याचे पूजन; आजरा उपजिल्हा रुग्णालयासह 31 कोटींच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन
आजरा, वृत्तसेवा :
आजरा राधानगरी भुदरगडचे कार्यसम्राट व पाणीदार आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या व आजरा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा सर्फनाला प्रकल्पाच्या पाणी पुजनाचा कार्यक्रम रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजता पाणीदार आमदार आबिटकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्याचबरोबर आमदार आबिटकर यांच्या माध्यमातून निधी मिळालेल्या सुमारे 31 कोटी 45 लाखांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ रविवारी दिवसभरात होणार आहेत.
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात खेडगे- पारपोली जवळ सर्फनाला हा जलप्रकल्प गेली पंचवीस वर्ष रखडला होता. आमदार आबिटकर यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे सन 2024 च्या पावसाळी हंगामात या जलप्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला. हा जल प्रकल्प पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे खेडगे-पारपोली पासून साळगाव-सोहाळे पर्यंत हिरण्यकेशी नदी बारमाही दुथडी भरून वाहणार आहे. प्रकल्पांतर्गत आजरा तालुक्यातील २० गावातील २६४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरलेल्या सर्फनाला जल प्रकल्पातील पाणी पूजनाचा समारंभ रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजता होणार आहे. त्याचबरोबर आजरा शहरातील माजी सैनिक सभागृहाचे दुपारी एक वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. या सभागृहासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
नागरिकाकडून गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या आजरा शहरातील आमराई गल्ली नदीवरील पुलासाठी सात कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ दुपारी 02.30 वाजता होणार आहे. दुपारी चार वाजता बौद्ध विहाराचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. या बौद्ध विहारासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सायंकाळी पाच वाजता आजरा तालुक्यासाठी मंजूर झालेल्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारती करिता 17 कोटी 25 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच आजरा शहरात उभारण्यात आलेल्या नवीन क्रीडा संकुलनाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रविवारी दिवसभरात होणाऱ्या सर्फनाला जलप्रकल्पातील पाणी पूजन तसेच विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन या समारंभासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
========================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब......
(संपर्क : 7410168989)
==========================
No comments:
Post a Comment