"गोकुळ" शीतकरण केंद्र लिंगनूर गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी अजित पाटील
गडहिंग्लज, वृत्तसेवा :
कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ (गोकुळ) शीतकरण केंद्र लिंगनूर (ता. गडहिंग्लज) गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अजित पाटील यांची तर उपाध्यक्षपदी जोतिराम कुंभार यांची निवड करण्यात आली. लिंगनूर शीतकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. सन 2024-25 सालचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे.
या वर्षीचा 2024-25 सालाकरिता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार व सदस्य यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष - अजित पाटील, उपाध्यक्ष - जोतिराम कुंभार, खजिनदार - दत्तात्रय लांडे, सदस्य - अनिल नवाळे, सिद्धेश्वर घुगरे, पांडुरंग कुंभार, समीर शिंदे, किरण डोमने, संदेश शिवणे, आनंदा मोदर, चंद्रकांत शिंदे, आप्पासो गायकवाड, सुनिल रेडेकर, प्रकाश चांदेकर, मधुकर ढोकरे, रवींद्र जाधव, साधना शिंदे
यावेळी शाखाप्रमुख शशिकांत गायकवाड, उपअधिकारी विद्यानंद शिंदे, उपअधिकारी संजय सावंत, युनियन प्रतिनिधी संभाजी देसाई, राजेंद्र पारदे, रवींद्र बामणे, दादासो मांडवकर, रणजीत शिंदे, विश्वास चव्हाण, विजय केसरकर, अमोल एकल, संजय पाटील, सुजित देसाई, अनिल शिउडकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
================
No comments:
Post a Comment