आजरा अर्बन बँकेच्या ३५ व्या फुलेवाडी (कोल्हापूर) शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न
आजरा, वृत्तसेवा :
मल्टी स्टेट दर्जा प्राप्त केलेली देशातील २१ वी नॉन शेड्यूल्ड नागरी सहकारी बँक व शेड्यूल्ड दर्जाकडे वाटचाल असलेल्या दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या ३५ व्या फुलेवाडी (कोल्हापूर) शाखेचे स्वमालकीच्या जागेत गुरुवार (दि.२५ जुलै) रोजी सकाळी ११ वा. ११ मि. अॅड. लुईस शहा (प्रथितयश विधीज्ञ व सहकार तज्ञ कोल्हापूर) यांचे शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.
याप्रसंगी अॅड. लुईस शहा यांनी ३५ व्या फुलेवाडी शाखेचे उदघाटन झालेचे जाहीर केले. यावेळी ॲड. शहा म्हणाले, अशोकअण्णा चराटी व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सक्षम पद्धतीने बँकेची वाटचाल चालली आहे. बैंकिंग रेग्युलेशन अॅक्ट मधील बदलाप्रमाणे संचालक मंडळाचा ८ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाले नंतर संचालक पद कमी करावे लागणार आहेत त्यामुळे सहकारी बँकांनी आता पासूनच काही जुने व नवीन संचालक मंडळाची रचना करूनच बँकेचे संचालक मंडळ स्थापन करून सहकाराची प्रगती करण्याचे जाहीर केले आहे. तसेच बँकेची उतरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा भाऊ संस्था समूह प्रमूख व बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांनी बँकेच्या
स्थापने पासूनची माहिती दिली. तसेच कल्याण शाखेचे उदघाटन १५ ऑगस्ट पर्यंत करणार असलेचे जाहीर केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व बँकेच्या आधुनिकीकरणबाबतची माहिती तसेच बँकेतील विविध सेवा सुविधांचीही माहिती दिली.
उदघाटन प्रसंगी उपाध्यक्ष सुनिल मगदुम, संचालक सुरेश डांग, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फड़के, प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, अस्मिता सबनिस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे तसेच परिसरातील प्रतिष्ठित मंडळी व मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर यांनी बँकेचा पूर्ण आढावा घेवून सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर यांनी केले तर आभार व समारोप बँकेचे संचालक विलास नाईक यांनी मानले.
================
No comments:
Post a Comment