Saturday, July 1, 2023

विकास सुतार यांचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान

विकास सुतार यांचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान

आजरा ः प्रतिनिधी


साळगाव (ता. आजरा) येथील पत्रकार विकास सुतार यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूरचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
सुतार हे गेले १२ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दै. पुढारी, पुण्यनगरी, किर्तीवंत, महासत्ता अशा विविध दैनिकांत काम केले आहे. एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने त्यांचा सर्वोेत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहूल रेखावर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, साळगावचे सरपंच धनंजय उर्फ भैय्या पाटील, अंकुश पाटील, अजित पाटील, किरण सुतार उपस्थित होते. सुतार यांचे पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
---  ----  ----

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...