कोल्हापूर (प्रतिनिधी) :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजासोबतच विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सकल मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. आरक्षण मिळावे अशी मागणी अजून जोर धरत आहे. बुधवार (दि. १६) रोजी शाहू महाराजांच्या समाधी स्थळावर अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनाला सुरूवात होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बुधवारी (दि. १६) रोजी कोल्हापूर येथे मूक आंदोलन होणार आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. पाहूयात कशी आहे आंदोलनाची रूपरेषा आणि नियमावली.
मराठा क्रांती मूक आंदोलनाची रूपरेषा :
सकाळी ०९.०० वाजता - पर्यंत महाराष्ट्रातील सर्व समन्वयकांनी आंदोलन स्थळी पोहचणे
सकाळी ०९.५० वाजता - समन्वयक, तरादुत, नोकर भरतीची मुले आणि लोकप्रतनिधींनी स्थानापन्न होणे
सकाळी १०.०० वाजता - छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यानंतर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात.
सकाळी १०.१० वाजता - लोकप्रतिनिधींनी राजशिष्टाचारनुसार मनोगत किंवा आपापली जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात करतील.
दुपारी ०१.०० वाजता - राष्ट्रगीताने मराठा क्रांती मूक आंदोलनाची सांगता.
दुपारी ०१.१५ वाजता - महाराष्ट्रातील समन्वयक आणि जिल्हा समन्वयक यांच्यासोबत लाँग मार्च संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक. श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती मार्गदर्शन करतील.
यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. या संदर्भातील नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.
पाहूयात काय आहेत नियम आणि कशी आहे ही नियमावली :
सर्वांची वेशभूषा काळ्या रंगाची असावी
प्रत्येकाने दंडावर काळी फीत बांधून येणे
प्रत्येकाने काळा मास्क वापरावा
शक्यतो सोबत येताना सॅनिटायझर आणावे
आंदोलनाच्या स्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, असे कोणतेही वर्तन करू नये
कोरोनाच्या नियमांचे पालन करावे